Home / News / पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड ठाण्यात ३ दिवस पाणी कपात

पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड ठाण्यात ३ दिवस पाणी कपात

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कालावधीत ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

भातसा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नाही.तसेच शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनच्या पंपामधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे.

दोन्ही पंपिंग स्टेशनच्या पंपामधील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात ९ ते ११ जुलै दरम्यान अपुऱ्या व अनियमित प्रमाणात पाणीपुरवठा होईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या