पीओपी गणेशमूर्तींना पर्याय सुचवा! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन

मुंबई- पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानिकारक असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यावर आता पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी प्रदूषण घटक कमी करण्यासाठी नवीन पर्याय सुचवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तिकार संघटना आणि तज्ज्ञांना केले आहे. त्यासाठी पुढील १० दिवसांत आपली माहिती खास ईमेलवर पाठवावी असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस वापराऐवजी विविध पर्याय अथवा याबाबत संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ति, संशोधक संस्था,संशोधक, मूर्तिकार,मूर्तिकार संघटना, तांत्रिक संस्था आणि तांत्रिक प्रयोगशाळा आदींकडे कोणतेही पर्याय,नवीन पर्यायाचा अभ्यास तसेच प्रयोग निरीक्षणे असल्यास संबंधितांनी पुढील १० दिवसांत expertganesh24@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. शासनास यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी २४ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक समिती नेमली आहे. या समितीमार्फत पीओपी मूर्तींऐवजी उपलब्ध पर्यायाचा करणे, प्रदूषण घटक कमी करणे त्याबाबतची पडताळणी करणे आदी कामांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top