Home / Top_News / पुढील वर्षी इस्रोचा शक्तिशाली उपग्रह येणार

पुढील वर्षी इस्रोचा शक्तिशाली उपग्रह येणार

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे....

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक किंवा भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा आगाऊ इशारा देणार आहे.निसार हा उपग्रह इस्रोने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या सहकार्याने विकसित केला आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन इस्रोने केले आहे. हा एक उपग्रह संपूर्ण जगातील नैसर्गिक आपत्तींचे पूर्वसूचना देण्यास सक्षम आहे.भूकंप, भूस्खल, जंगलांमध्ये पेटणारे वणवे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, वीज कोसळणे, ज्वालामुखीचा उद्रेक, भूगर्भातील प्रतलांच्या हालचाली आदिंची माहिती निसार देणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या