पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळ

मुंबई

राज्य सरकारने २०२४ या नवीन वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया मिळणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार ८ वेळा सलग तीन दिवस सुट्टयांचा लाभ शासकीय कर्मचारी-अधिकारी आणि शनिवार-रविवार सुट्टया असणाऱ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. या यादीत स्थानिक सुट्यांचा समावेश नाही.

पुढील वर्षी २६ जानेवारी शुक्रवारी येत असल्याने खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्टी मिळेल. त्याचबरोबर १९ फेब्रुवारीला सोमवारी शिवजयंती, ८ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री, २५ मार्चला सोमवारी होळी, २९ मार्चला गुड फ्रायडे, १७ जूनला सोमवारी बकरी ईद, १५ नोव्हेंबरला शुक्रवारी गुरुनानक जयंती, अशा सुट्ट्या असल्याने यादम्यान शनिवार रविवार अशा लागून तीन दिवस सुट्ट्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहेत. याशिवाय २६ ते २८ मार्च अशा तीन दिवसांची रजा घेतल्यास २३ ते ३१ मार्च असा लाँग वीकेंडचा आनंद घेण्याची संधी नोकरदारवर्गाला मिळणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात सर्वाधिक पाच शासकीय सुट्टया आहेत. ९ एप्रिलच्या मंगळवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. ६ व ७ एप्रिलच्या शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून ८ एप्रिल सोमवारची रजा घेऊन सलग चार दिवस सुट्टयांचा आनंद घेण्याची संधी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top