पुणेकरांसाठी टॉयलेट सेवा ॲप! एका क्लिकवर स्वच्छतागृहाची माहिती

पुणे- पुण्याच्या स्वच्छतेकडे आणि पुणेकरांच्या आरोग्याच्या दिशेने पुणे महापालिकेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत पुणे शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता ‘टॉयलेट सेवा ॲप’ यावर मिळणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या या ॲपचा पुढचा टप्पा महापालिकेने सुरू केला आहे. या माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
‘टॉयलेट सेवा ॲप’ हे ॲप पुणे शहरातील ११८३ सार्वजनिक शौचालयांची सविस्तर माहिती देते. यामुळे वापरकर्त्यांना सुविधांबद्दल अभिप्राय नोंदविता येतो, तसेच केंद्र सरकारच्या २०२३ च्या ‘स्वच्छ शौचालय’ उपक्रमाच्या अनुषंगाने ‘स्वच्छ शौचालय स्पर्धा’ आयोजित करण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. या ॲपवर जवळचे स्वच्छतागृह शोधण्याबरोबरच वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाइट, महिलांसाठी सॅनिटरी पॅड इत्यादी सुविधांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करुन दिली आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत पुणे शहरात स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top