पुणे-नाशिक महामार्गावर अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक आणि जीपच्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. हा भीषण अपघात मंचरजवळ पहाटेच्या सुमारास झाला. नाशिकहून भोसरीच्या दिशेने जाताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत जीपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. दाट धुके असल्याने समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. या अपघातातील ५ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top