पुणे परिवहनच्या ताफ्यात ३०० नव्या सीएनजी बस

पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) याशिवाय ४०० नवीन बस या भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० सीएनजी व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. सीएनजी बस दाखल होण्यास किमान ३ महिन्यांचा अवधी लागणार असून, इलेक्ट्रिक बसला या पेक्षा अधिक मात्र उशीर होणार आहे. या बस १२ मीटर लांबीच्या बस असतील.

सध्या पीएमपीच्या स्वमालकीच्या ९८१ बस आहेत, तर सात ठेकेदारांच्या मिळून १०९८ बस आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या एकूण ४०० बस पैकी ३०० बस सीएनजी आहेत, तर १०० इलेक्ट्रिक आहेत. सीएनजीवर होणारा खर्च हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत कमी आहे. सीएनजीच्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ३०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान दोन लाख १९ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल. शिवाय विविध मार्गावरच्या बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. नव्या बसमुळे प्रवाशांची सोय होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top