Home / News / पुणे महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांना हेल्मेटसक्ती

पुणे महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांना हेल्मेटसक्ती

पुणे – महापालिकेची मुख्य इमारत तसेच शहरातील इतर कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न...

By: E-Paper Navakal

पुणे – महापालिकेची मुख्य इमारत तसेच शहरातील इतर कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास त्यांना महापालिकेच्या आवारात प्रवेश देऊ नये तसेच वाहन पार्किंग करण्यासही मनाई करावी, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले आहेत.

रस्ते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर तसेच वाहतूक नियमांचे पालन स्वतःपासून सुरू करण्याची गरज असल्याने विभागीय आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश महापालिकेलाही मिळाले असून त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांना आजपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या