Home / News / पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या १६ फेर्‍या वाढल्या

पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या १६ फेर्‍या वाढल्या

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे विभागातील साईनगर शिर्डी-बिकानेर, हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे विभागातील साईनगर शिर्डी-बिकानेर, हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्यांच्या एकूण १६ फेऱ्या वाढविण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बड़पग्गा यांनी सांगितले की,साईनगर शिर्डी-बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. गाडी क्र. ०४७१६ शिर्डी-बिकानेर ही २२ आणि २९ डिसेंबरला धावेल. गाडी क्र. ०४७१५ बिकानेर-शिर्डी ही २१ आणि २८ डिसेंबरला धावेल. हडपसर हिस्सार-हडपसर विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, गाडी क्र. ०४७२४ हडपसर-हिसार ही २३ आणि ३० डिसेंबरला धावेल. तर गाडी क्र. ०४७२३ हिसार-हडपसर ही २२ आणि २९ डिसेंबरला धावेल. दौंड-अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार असून गाडी क्र. ०८६२६ दौंड-अजमेर ही २० आणि २७ डिसेंबरला धावेल. तर गाडी क्र. ०८६२५ अजमेर-दौंड ही १९ आणि २६ डिसेंबरला धावेल. सोलापूर-अजमेर-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीच्याही चार फेऱ्या वाढविल्या असून, गाडी क्र. ०९६२८ सोलापूर-अजमेर ही १९ आणि २६ डिसेंबरला धावेल.तर गाडी क्र. ०९६२७ अजमेर-सोलापूर ही १८ आणि २५ डिसेंबरला धावणार आहे. या गाड्यांच्या थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.

Web Title:
संबंधित बातम्या