पुण्याच्या खराडीतील गोदामाला भीषण आग

पुणे
पुण्याच्या खराडीतील गोदामाला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. आगीमुळे मोठा धूर झाल्याने परिसरात घबराट पसरली . या आगीचे कारण समजू शकले नाही.
खराडीत शिंदे डेअरीजवळ असलेल्या गोदामात महापालिकेने एका गोदामात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवले होते. आज दुपारी अडीचच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top