पुण्यातील पर्यटकाचा मुरुडमध्ये बुडून मृत्यू

मुरूड जंजिरा:

काशीद समुद्र किनारी पुणे येथील जुबेद शेख या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दिवाळी सुट्टी असल्याने काशीद,आणि मुरूड बीचवर मोठ्या प्रमाणात राज्यातून पर्यटक आले आहेत. शुक्रवारी सकाळी पुणे येथील पर्यटकांचा २० जणांचा समूह काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी आला होता.सकाळी सकाळी त्यातील काही लोकांच्या समवेत जुबेद शेख हा तरुण देखील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता.पोहता पोहता हा तरुण खोल पाण्यात गेल्याने त्याचा पाण्यात बुडून अखेर मृत्यू झाला. दुपारी त्याचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top