पुण्यात कर्नल पुरोहित यांचेशोभायात्रा काढून जंगी स्वागत

पुणे – कर्नल प्रसाद पुरोहित यांची 2008 मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून 17 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर आज पहिल्यांदाच ते त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी शोभायात्रा काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.या शोभायात्रेत शहरातील काही संघटना सहभागी झाल्या होत्या. पुण्यातील लॉ कॉलेज मार्गावर कर्नल पुरोहित यांचे निवासस्थान आहे. या मार्गाच्या सुरुवातीपासून त्यांच्या घरापर्यंत ही शोभायात्रा काढली होती. पुरोहित यांनी मिरवणुकीवेळी डोक्यावर भगवा फेटा बांधला होता. त्यांच्या स्वागताच्या गाडीला दोन्ही बाजूने तिरंगा झेंडा लावलेला होता. या शोभायात्रेत ढोल-ताशांचा गजर आणि चहुबाजूंनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुरू होता. यावेळी स्थानिकांकडून पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या. ‘वेलकम होम काका’ असा मजकूर लिहिलेले पोस्टर या मिरवणुकीत झळकत होते. कर्नल पुरोहित यांनी भावना व्यक्त केल्या की, मी ज्या सोसायटीत राहतो ते माझे कुटुंब आहे. येथील लोकांनी मला लहानपणापासून पाहिले आहे. आज माझे कुटुंब माझे भव्य स्वागत करत आहे. मला या क्षणाचा खूप आनंद झाला आहे.
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट संबंधित खटल्यात एनआयए विशेष न्यायालयाने सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष असल्याचा निकाल दिला. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.
2:22 झच्, 8/3/2025 गरूीहीशश घहरवळश्रज्ञरी रिपवश चरवरा: पान 1 पेजहेडिंग 2 का