पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय! येरवड्यात १२ वाहनांची तोडफोड

पुणे- विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे शहरात ड्रग्ज तस्करीचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.सोमवारी रात्री कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन जणांना अटक केली.अजय चित्रगुप्त बागरी आणि सुमित भारत सितापराव अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर येरवडा आरोपींवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.हे दोघे सोमवारी रात्री येरवडा परिसरात आले.त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली.या हल्लेखोरांच्या हातात कोयता तसेच हॉकी स्टिक होत्या.काही वेळानंतर त्यांनी भररस्त्यात धुमाकूळ घातला.तसेच परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड करून ते फरार झाले.मात्र येरवडा पोलिसांनी त्यांची धरपकड केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top