पुण्यात मोदींच्या सभेसाठी मोठा पोलीस फौजफाटा

पुणे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर होणार आहेत. ते भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सायंकाळी ६ वाजता सभा घेणार आहेत. या सभेसाठी पुण्यात पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

या सभेसाठी पुणे पोलीस सज्ज झाले असून त्यांनी स.प.महाविद्यालयाच्या मैदान आणि मार्गांची पाहणी केली. यावेळी शहरात मोदींच्या सभेला भाजपाने सुमारे ६० हजार लोक येतील, असा अंदाज वर्तवला आहे. मोदींच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सभास्थानी मोबाईलव्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. जिल्ह्यांतून पोलिसांच्या पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top