Home / News / पुण्यात सुपरमार्केटला आग

पुण्यात सुपरमार्केटला आग

पुणे- पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील मतेनगर येथे आज एका सुपर मार्केटला भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली...

By: E-Paper Navakal

पुणे- पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील मतेनगर येथे आज एका सुपर मार्केटला भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ८ वाहने दाखल होऊन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही वेळात त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुपर मार्केटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या