पुतिन यांचे नरेंद्र मोदींना रशियाच्या भेटीचे निमंत्रण

मॉस्को
युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर प्रचंड चर्चेत राहिलेले रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले आहे. पुढील वर्षी वार्षिक शिखर परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची भेट होईल, अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी एक्सवरुन दिली. 
रशिया दौऱ्यावर असणारे जयशंकर यांनी पुतिन यांची भेट घेतली. यावेळी पुतिन म्हणाले की, ‘आम्हाला आमचे मित्र पंतप्रधान मोदी यांना रशियामध्ये पाहून आनंद होईल, मला माहीत आहे की, निवडणुकीमुळे पुढील वर्षी भारताचे राजकीय वेळापत्रक व्यग्र असेल. मी आता त्यांची रशियात वाट पाहत आहोत. संघर्ष आणि शांततापूर्व मार्गाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल मी आभारी मानतो. कच्चे तेल आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांमुळे रशिया आणि भारत यांच्यातील व्यापार वाढत आहेत. युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरही भारत आणि रशियामधील संबंध मजबूत राहिले आहेत.`

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top