Home / News / पुनम महाजन यांनी घेतली अमित शहा यांची भेट

पुनम महाजन यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या माजी खासदार पुनम महाजन यांनी आज सकाळी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या माजी खासदार पुनम महाजन यांनी आज सकाळी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे उघड झाले नसले तरी पुनम महाजन यांनी राजकीय पुनर्वसनबाबत ही भेट घेतल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुनम महाजन यांनी उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या जागी सरकारी वकील उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून संधी दिली होती. या भेटीनंतर पुनम महाजन यांचे राजकीय पुनर्वसन होणार का? अशी देखील राजकीय चर्चा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या