पूर्णपणे वीजेवर चालणारे विमान १० वर्षांनी आकाशात उडणार

लंडन –

लंडनमधील इलिसियान या डच कंपनीने पूर्णपणे ईलेक्ट्रिक विमानाचे डिझाईन तयार केले आहे. या विमानातून ९० प्रवासी हवाई प्रवास करू शकतील. हे विमान येत्या १० वर्षांमध्येच म्हणजे २०३३ पर्यंत लाँच होणार अशी चर्चा आहे.

हे बॅटरीवर चालणारे इ १ एक्स कन्सेप्ट विमानाचे डिझाईन बनवले असून एकदा चार्ज झाले की, ते ८०० किलोमीटरचे अंतर कापू शकते. त्याचा बॅटरी पॅक ३६० वॉट-अवर्स प्रति किलोग्रॅम आहे. भविष्यात हे विमान १ हजार किलोमीटरचा पल्लाही गाठू शकते. या विमानाचे डिझाईन तसेच त्यामधील मुलभूत तंत्रज्ञानाचा विकास डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरॉनॉटिक्स अँड जर्नलमध्ये देण्यात आली. यापूर्वी असे मानले जात होते की, केवळ १९ प्रवाशांसाठीचे ईलेक्ट्रिक विमान बनवले जाऊ शकते. हे विमान ४०० किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top