पृथ्वीच्या जवळून निघून गेला फुटबॉल मैदानाएवढा लघुग्रह

वॉशिंग्टन – फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचा एक लघुग्रह शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळून निघून गेला,अशी माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने दिली.
नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने या लघुग्रहाचा मागोवा घेतला. २००८ ओएस-७ से या लघुग्रहाचे नाव आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून २.८५ दशलक्ष किलोमीटर अंतरावरून निघून गेला. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतराच्या सातपट आहे,असे नासाने सांगितले. लघुग्रहाची रुंदी सुमारे ८९० फूट होती.आता पुन्हा काही शतकांनंतर हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top