पॅलेस्टाईन समर्थकांचा रशियाच्या मखचकला विमानतळावर हल्ला

मॉस्को

पॅलेस्टाईन समर्थकांचा संतप्त जमाव अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देत काल रात्री रशियाच्या मखचकला या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. या जमावाने इस्रायली नागरिकांना मारण्यासाठी विमानतळावर आलेल्या विमानाकडे धाव घेतली. त्यातील काहीजण विमानात चढले. यात १० जण जखमी झाले. त्यातील २ जण गंभीर जखमी झाले.
तेल अवीवहून निघालेले रेड विंग्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.१७ च्या सुमारास मखचकला येथे उतरले. यावेळी विमानतळ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी विमानतळ बंद केला. मात्र, पॅलेस्टाईन समर्थकांचा जमाव विमानतळावर धावून गेला.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये विमानतळावर आणि धावपट्टीवर लोकांचा जमाव दिसत आहे. काही जणांच्या हातात पॅलेस्टिनी ध्वज आहेत.
‘मखचकला विमानतळाच्या क्षेत्रात अज्ञातांच्या प्रवेशानंतर येणारी आणि जाणारी विमाने तात्पुरती वळवण्यात आली. त्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे रशियाच्या एव्हिएशन एजन्सी रोसावित्सियाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top