पेटीएम अध्यक्ष आणि सीईओ भावेश गुप्ता यांचा राजीनामा

नवी दिल्ली

पेटीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे कंपनीचा राजीनामा दिला आहे. ३१ मे रोजी त्यांचा कंपनीतील कार्यकाळ संपणार आहे. राजीनाम्यानंतर गुप्ता यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजीनाम्याचा कार्यकाळ संपल्यानंतर गुप्ता सल्लागारपदी रुजू होणार आहेत. ते वर्षाच्या अखेरीपर्यंत पेटीएमच्या उपक्रमांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

गुप्ता यांच्या राजीनाम्यांतर पेटीएमचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राकेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंग हे पूर्वी फिस्डम येथे स्टॉक ब्रोकिंग व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी कंपनीतील योगदानाबद्दल गुप्ता यांचे आभार मानले आणि राकेश सिंग यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top