पे पालची २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा

मुंबई

पेमेंट फर्म पे पाल होल्डिंग्सने त्यांच्या २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पे पालचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेक्स ख्रिस यांनी ही घोषणा केली आहे. या नोकरकपाती बाबत कंपनीने त्यांच्या कर्माचाऱ्यांना पत्र देखील पाठविले आहे.

अधिकारी ख्रिस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीला त्यांचे कर्मचारी ९ टक्क्यांनी कमी करायचे आहेत. कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी थेट कट आणि ओपन रोल कपात वर्षभर सुरु राहणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे, त्यांना आठवडाभरात याबाबत माहिती दिली जाईल. कर्मचारी कपातीच्या माध्यमातून कंपनीला नफ्यात वाढ करायची आहे. याचा फायदा वापरकर्त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी केला जाईल. तसेच ज्या व्यवसायांमध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्यामध्येही आम्हाला गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पे पालने सुमारे २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स सुमारे २० टक्के घसरले. या काळात कंपनीच्या उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे कंपीन त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे. कॅश ॲप ब्लॉक इंक देखील सुमारे १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायची आहे. कंपनीला १३,००० कर्मचारी कमी करून १२,००० करायचे आहेत. तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ गेम विभागातील १९०० कर्मचाऱ्यांना काढण्याची योजना आखत आहे. या कपातीचा ऍक्टीव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्ससह इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top