पोर्ट मोर्सबीमध्ये उसळली दंगल१६ जण ठार! दुकाने लुटली

पोर्ट मोर्सबी – पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी असलेल्या पोर्ट मोर्सबीमध्ये दंगल उसळली असून या दंगलीत आतापर्यंत १६ लोकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, सरकारने देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.त्यातच पगाराच्या प्रश्नावरून पोलिस संपावर गेल्याने तेवढीच संधी साधत समाजकंटकांनी लुटालूट सुरू केली.

अनेकांनी राजधानी शहरातील दुकाने,मॉल लुटले तसेच वाहने पेटवून दिली.पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात घडल्या प्रकाराबादल माफी मागत दंगलखोरावर कारवाई होईल,असे स्पष्ट केले आहे. बुधवारी सायंकाळी पोलिस कामावर रजू झाले. लष्करालाही पाचारण करण्यात आले,त्यानंतर दंगल नियंत्रणात आली. या दंगलीत पोर्ट मोर्सबी शहरात आठ जणांचा मृत्यू झाला तर सिटी ऑफ लीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. पोर्ट मोर्सबीचे राज्यपाल पॉवेस पार्ककॉप यांनी सांगितले की,अशा प्रकारची तणावाची स्थिती आम्ही शहरात पहिल्यांदाच पाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top