पोलादपूरमध्ये बैल दिवाळी बैलांना नाचविण्याची परंपरा

पोलादपूर – तालुक्यातील अनेक भागात काल देव दिवाळीपासून आगळीवेगळी परंपरा असलेल्या बैल दिवाळीला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवळे ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या दाभिळ गावात बैल दिवाळी सण साजरा करण्यात आला.या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गावकरी आपले बैल नाचविण्यासाठी एकत्र येत असतात.

तालुक्याच्या ग्रामीण भागात ही बैलदिवाळी साजरा केली जाते.यादिवशी बैलांना सजवून शेताच्या खाचरांमधून नाचवले जाते. बैलांच्या शिंगांना झुपकेदार, रंगबिरंगी तुरे लावून त्याची वेसण मालकाच्या हाती दिली जाते.त्यानंतर कापणी, मळणी झालेल्या शेताच्या बांधावरून बैलाला खाचरात उतरवले जाते.दोन वेसणी लावलेला बैल वेसण ओढताच पुढच्या पायांवर झुकून उडी मारतो.त्यामुळे तो बैल नाचल्यासारखा वाटतो.या नाचानंतर ग्रामस्थ त्याच्याभोवती काठ्या घेऊन फिरतात.या काठ्याच्या टोकाला बकरीच्या केसाच्या झुपक्यासह चामडे लावलेले असते.हे बैल नाचविण्यासाठी अनेक बैल मालक गावात मुक्कामाला असतात.ही परंपरा बैलासाठी उपयुक्त असते. यामध्ये बैलाची अंगातील मरगळ झटकली जाते.बैल ताजातवाना होतो असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top