प्रतिक्षा नगरच्या बेस्ट बसेस मार्गांत बदल

मुंबई
प्रतिक्षा नगर विभागात हेमंत मांजरेकर मार्ग, शिवाजी चौक जंक्शन येथे सीवरेज पाईपलाईनचे काम सुरू केल्यामुळे या मार्गावरील काही बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये काही बदल करण्यात आल्याचे बेस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
क्रमांक १४, १५, ८८, १६९, १७२, १७२एसी, २५५, ३१२ व ३४८ च्या बसेस कोकरी आगर, वादाला मोनोरेल मार्गे धावतील. त्यामुळे सुंदर विहार हॉटेल, माला गार्डन, प्रतीक्षा नगर नंबर १ तसेच समाज मंदिर हॉल हे थांबे तात्पुरते रद्द झाले आहेत.
त्याऐवजी बदललेल्या मार्गावर या बसेसना जजेस सोसायटी, वडाळा मोनोरेल व कोकरी आगार हे तात्पुरते बस थांबे देण्यात आले आहेत. पुढे रावळी कॅम्पपासून बसेस आपापल्या पूर्वीच्या मार्गाने जातील. सदर बदल सुमारे २ ते ३ लागू असेल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top