प्रभू रामांच्या प्रतिष्ठापनेदिवशी नेपाळमध्ये दिवाळी साजरी होणार

काठमांडू

अयोध्येत प्रभू श्री रामांच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यादिवशी नेपाळमध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. नेपाळमधील वीरगंजमध्ये दीपोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

नेपाळमधील वीरगंज येथील गहवा माई मंदिर संकुलात २२ जानेवारी रोजी सव्वा लाख दीव्यांच्या दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वीरगंज, कलैया, नारायण घाट, गौर, जनकपूर यासह नेपाळमधील विविध शहरांत आणि मंदिरांमध्ये महादीप उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी प्रत्येक घरात ११ दिवे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, शंखध्वनी, घंटा वाजवणे, विजय मंत्र आणि श्री रामां १०८ च्या जपासह सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वीरगंजमध्ये विविध संघटनांकडून दिव्यांच्या रोषणाईसह महाआरती, झांज, विशाल बाईक रॅली, राम धुन, राम कथा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह कार्यक्रम आयोजित केले आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top