प्रवाशांच्या सेवेसाठी ‘एसटी’तर्फे अहमदनगरला १० हिरकणी बस

अहमदनगर – प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने अहमदनगर विभागाला नवीन १० हिरकणी बस देण्यात आल्या आहेत. ही बस पुणे मुंबई, शेगाव व छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहेत. या बसला जास्तीचे भाडे आकारण्यात येणार आहे. अहमदनगर ते पुणे या बसला सध्या दीडशे रुपये भाडे आहे. तर नव्या बसचे भाडे २५० रुपये असेल.

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे. त्यामुळे जुन्या झालेल्या बसच्या जागी दुसर्‍या बस घेणे महामंडळाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सहा महिन्यांपूर्वी अहमदनगर विभागाला जेमतेम १० नवीन लालपरी उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, अहमदनगर विभागाकडे २०१९ मध्ये एकूण साडेसातशे बस होत्या. त्यानंतर काही बस जुन्या झाल्यामुळे भंगारात काढण्यात आल्या आहेत. काही अपघातामुळे पूर्णपणे नादुरुस्त झाल्या. त्यामुळे सध्या ६४३ बस आहेत. त्यापैकी जवळपास ५८५ बस सुरू आहेत. विभागासाठी आणखी १०० नवीन बसची आवश्यकता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top