प्रसिद्ध कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू

इंदूर- मध्यप्रदेशातील प्रसिद्ध असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘शौर्य’ नावाच्या चित्त्या मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास
नामिबियाहून आणलेला हा चित्ता बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान शौर्यचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समजू शकेल.

सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर २०२३ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले गेले.असे एकूण २० चित्ते आणले होते. त्यापैकी १० चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यात सात चित्ते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे.आता सहा महिन्यांनंतर आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला.हा चित्ता नामिबियातून आणल्यापासून अशक्त होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top