प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधानांची रामसेतूवर पूजाअर्चा

धनुषकोडी –
अयोध्येत राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राम सेतूचे आरंभ स्थान असलेल्या तामिळनाडूतील अरिचल मुनई या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या सागरात अर्घ्यही दिले. त्यानंतर त्यांनी तिथल्या कोठंडाराम मंदिरातही पूजा केली.
रावणाच्या कैदेतून सीतेची सुटका करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेवर स्वारी केली. यावेळी त्यांच्या वाटेत सागराचा अडसर होता. त्यावेळी राम नामाच्या दगडांचा वापर करत एक सेतू बांधण्यात आला होता. या सेतूची सुरुवात तामिळनाडू राज्यातल्या अरिचल मुनई या गावी असलेल्या समुद्र किनार्यापासून होते. याच ठिकाणी रामाच्या धनुर्धारी वेषातले कोठंडाराम मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या ठिकाणी जाऊन पूजा केली. पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या निमित्ताने त्यांनी विशेष अनुष्ठानही ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते देशातील वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी अरिचल मुनई येथे केलेल्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top