फसवणूकप्रकरणी आमदार शिंदेंच्या मुलाला सहा महिन्यांचा कारावास

सोलापूर – सैनिक फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यालाही सहा महिने कारावासाची शिक्षा दिल्लीतील साकेत न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी ट्विंकल चावला यांनी सुनावली आहे. महिनाभरात साडेसात कोटी रुपये तक्रादाराला देण्याचे आदेश शिंदेंना न्यायालयाने दिले आहेत.

रणजितसिंह शिंदे यांची कर्नाटकात इंडियन शुगर कंपनी आहे. त्यांनी सैनिक फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत साखर पुरविण्याबाबत करार केला होता. या करारामध्ये ५२०० टन साखरेचा पुरवठा करण्याचे शिंदेंनी मान्य केले होते. यासाठी त्यांनी फूड कंपनीकडून १० कोटी रुपये आगाऊ घेतले होते. २०१६-१७ साली शिंदेनी फूड कंपनीला केवळ १९४२ टन साखरेचा पुरवठा केला आणि उर्वरित रक्कमेसाठी कंपनीला पाच कोटी रुपयांचा धनादेश दिला. पण हा धनादेश वटला नाही, त्यामुळे सैनिक फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. फूड कंपनीने तक्रारीत उर्वरित रक्कमेची मागणीही केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top