फायर कँडल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

सात महिलांचा होरपळून मृत्यू

चिंचवड

चिंचवडमधील तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या फायर कँडल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली. ही घटना आज दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये ७ महिला कामागारांचा होरपळून मृत्यू झाला. या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिलाच आहेत.

तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर आहे. स्फोटाच्या आवाजाने हे शटर बंद झाल्याने सर्व महिला आतच अडकल्या. त्यातील ७ जणींनी आपले प्राण गमावले. काही महिला जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी चिखली आणि देहूरोड पोलीस पोलीस प्रशासन आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top