फुग्याचा तुकडा घशात अडकून मुलीचा मृ्त्यू

लखनौ :

फुग्याने लहानग्या मुलीचा जीव घेतल्याची घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात घडली. मोतीखेडा गावातील एक ६ वर्षीय मुलगी तोंडाने फुगा फुगवत होती. फुगा फुटल्याने फुग्याचा एक तुकडा तिच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यात तिचा गुदमरून मृत्यू झाला.

मोतीखेडा येथील रहिवासी देवदत्त यांची ६ वर्षांची मुलगी अभिलाषा हिचे काका मोहितकुमार यांच्या घरी मंगळवारी हळदीचा कार्यक्रम होता. अभिलाषा तिथे फुग्यांसोबत खेळत होती. यानंतर तिने फुगा फुगवायला घेतला. मात्र फुगा फुटल्याने त्याच्या काही भाग तिच्या घशात अडकला. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top