फेसबुक पहिल्यांदाच लाभांश देणार झुकरबर्गना ५,८०० कोटी मिळणार!

कॅलिफोर्निया :

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने प्रथमच आपल्या भागधारकांना डिव्हिडंड (लाभांश) देण्याची घोषणा केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांना या डिव्हिडंडचा मोठा फायदा होणार आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे की, मेटाच्या या घोषणेमुळे झुकरबर्ग दरवर्षी सुमारे ७०० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ५,८०० कोटी रुपये कमावणार आहेत.

मेटाने वर्ग ए आणि वर्ग बी कॉमन स्टॉकवर प्रत्येक तिमाहीत प्रति शेअर ५० पेन्सचा रोख डिव्हिडंड दिला आहे. मार्क झुकरबर्गकडे मेटाचे सुमारे ३५ कोटी शेअर आहेत. अशा प्रकारे त्यांना प्रत्येक तिमाहीत सुमारे १७५ दशलक्ष डॉलर मिळतील.

२०२२ या वर्षात मेटाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर २०२३ वर्ष हे रिकव्हरीचे ठरले. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षी २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर २०२३ मध्ये मेटा शेअर्सची किंमत जवळपास ३ पटीने वाढली होती. मेटा शेअरच्या वाढीमुळे मार्क झुकरबर्ग यांना खूप फायदा झाला आहे. मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा जगातील ५ श्रीमंतांच्या यादीत सामील झाले. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार, मार्क झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती १३९.३ अब्ज डॉलर आहे. या संपत्तीमुळे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top