फ्लिपकार्ट १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

बेंगळुरू –
वॉलमार्टच्या मालकीची कंपनी फ्लिपकार्ट ही कंपनी १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. खराब कामगिरीच्या आधारावर या कर्मचाऱ्यांना काढले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. फ्लिपकार्टच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के इतका हा आकडा आहे.
फ्लिपकार्ट ही कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षात केलेल्या कामाच्या आधारे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान कामगिरीचे मूल्यांकन करते. २०२३ मधील कामगिरीचे मूल्यांकन संपल्यानंतर एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाऊ शकते.
बेंगळुरूच्या या कंपनीच्या पगारावर सुमारे २२,००० कर्मचारी आहेत. मूल्यांकन कार्य जानेवारीमध्ये सुरू झाले असून अंदाजे आणखी काही आठवडे चालू राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top