Home / News /  बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 518 पदांसाठी भरती सुरू

 बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 518 पदांसाठी भरती सुरू

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदाने जवळपास 518 पदांची भरती जाहीर केली आहे. बँकेत नोकरी इच्छित असणारे उमेदवार या पदांसाठी...

By: Team Navakal

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदाने जवळपास 518 पदांची भरती जाहीर केली आहे. बँकेत नोकरी इच्छित असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज भरू शकतात. बँक ऑफ बडोदा अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, त्याबाबत जाणून घेऊया.

या पदांसाठी निघाली भरती

बँक ऑफ बडोदाद्वारे सीनियर मॅनेजर, मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रेड आणि फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि सुरक्षा विभागासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे.

पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/ बीटेक/ एमटेक/ एमई/ कंप्युटर सायन्समध्ये एमसीए/ इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ आयटी/ डाटा सायन्स/ पदवी/ सीए/ पदव्युत्तर पदवी यापैकी कोणतीही डिग्री असणे आवश्यक आहे. तुम्ही अधिकृत जाहिरातीमध्ये पदांसाठीची पात्रता पाहू शकता.

अर्ज शुल्क व निवड प्रक्रिया

इच्छुक व पात्र उमेदवार www.bankofbaroda.in वर जाऊन 11 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी हे शुल्क 100 रुपये आहे.

लिखित परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत अशा विविध टप्प्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या