बंगळुरुमध्ये आयटीचा छापा पलंगाखाली ४२ कोटींची रोकड

बंगळुरू – कर्नाटकातील राजधानी बंगळूरुमध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत मोठे घबाड हाती लागले. आरटी नगरजवळील आत्मानंद कॉलनीत एका फ्लॅटमधील पलंगाखाली २३ बॉक्समध्ये तब्बल ४२ कोटी रुपये सापडले. ही रोकड ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक आणि त्याच्या पतीची चौकशी करण्यात येत आहे.

आयकर विभागाने छापा टाकला त्यावेळी या फ्लॅटमध्ये कोणीही आढळून आले नाही. फ्लॅटच्या मालकाबद्दल आयटी अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. याप्रकरणी महिलेसह तिच्या पतीची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला यापूर्वी नगरसेवक होती. या महिलेचे पती कंत्राटदाराचे काम करतात. त्यांची कंत्राटदार युनियनमध्येही भागीदारी आहे. भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सीएन अश्वत्थ नारायण यांनी ही रक्कम काँग्रेसने कंत्राटदारांकडून आगामी निवडणुकीसाठी कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप केला आहे, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आरोप निराधार असून भाजप यात राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top