बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याची हत्या

बहरामपूर – तृणमूल काँग्रेसचे नेते सत्यन चौधरी यांची पश्चिम बंगालमधील बेहरामपूर इथे हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.
रविवारी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सत्यन चौधरी यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सत्यन चौधरी हे या आधी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येसंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top