बजेटपूर्वी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्समध्ये ५४४ अंकांनी वाढ

मुंबई :

केंद्रीय बजेटच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४०० अंकांच्या वाढीसह ७१,७५२ वर बंद झाला. निफ्टीनेही ११० अंकांची उसळी घेतली असून तो २१,७२५ वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी बँकिंग, वाहन आणि फार्मा क्षेत्रात झाली.
आज शेअर बाजारात डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली, तर आयशर मोटर, सन फार्मा आणि टाटा मोटरचे शेअर ही वाढीसह बंद झाले. लार्सन अँड टुब्रो, टायटन, बीपीसीएल आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांचे शेअर बाजारात सर्वाधिक घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top