बजेटपूर्वी सेन्सेक्स घसरला निफ्टी २१,५२२ वर स्थिरावला

मुंबई :

केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आज शेअर बाजारात सेन्सेक्स तब्बल ८०१ अंकांनी घसरून ७१,१३९ वर बंद झाला. तर निफ्टी २१५ अंकांच्या घसरणीसह २१,५२२ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर रियल्टी आणि पीएसयू बैंक वगळता इतर सर्व शेअरमध्ये घसरण झाली . कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, फार्मा आणि पॉवर ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अंतरिम आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे बेंचमार्क निर्देशांक आज १ टक्क्यांनी घसरले. पॉवर आणि विक्रीचा बाजाराला फटका बसला. दरम्यान, मेटल, रियल्टी आणि ऑईल आणि गॅस खरेदीमुळे तोटा कमी झाला. मागील सत्रातील वाढीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या हेवीवेट शेअर्समध्ये आज नफावसुली दिसून आली.

बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. काल बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३७७.२० लाख कोटी रुपयांवर होते. ते आज ३७५.३६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.८४ लाख कोटी रुपयांची घट झाली.

सेन्सेक्स आज ७२ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,१०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचे मोठे नुकसान झाले. हा शेअर तब्बल ५ टक्क्यांनी घसरून ६,८१० रुपयांवर आला. बजाज फिनसर्व्ह सुमारे २.८० टक्क्यांनी घसरून १,५९० रुपयांवर आला. टायटनचा शेअरही ३ टक्क्यांनी घसरला. टॉप लूजर्समध्ये आयटीसी, रिलायन्स, अल्ट्राटेक, एनटीपीसी, रिलायन्स, सन फार्मा, एलटी हे शेअरही होते, तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय हे शेअर वाढले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top