बन्सल बंधूंचे फ्लिपकार्टशी नाते संपुष्टात बिन्नी यांचा संचालकपदाचा राजीनामा

नवी दिल्ली
फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी अधिकृतरित्या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल  बंधूंचे फ्लिपकार्टशी असलेले नाते पूर्णपणे संपुष्टात आले आहे. बिन्नी बन्सल आता ओपनडोअर या कंपनीवर आपलं पूर्ण लक्ष देणार आहेत.

आता बन्सल बंधूंकडे फ्लिपकार्टचे काहीच हक्क राहिलेले नसून त्यांनी आपल्याकडील फ्लिपकार्टची मालकी पूर्णपणे विकली आहे. 

सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी मिळून १६ वर्षांपूर्वी फ्लिपकार्टची स्थापना केली होती. फ्लिपकार्ट वॉलमार्टला विकल्यानंतर २०१८ मध्ये सचिन बन्सल कंपनीपासून वेगळे झाले होते. आता बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. फ्लिपकार्ट आणि बिन्नी बन्सल यांनी दोघांकडूनही निर्णयाला दुजोरा देण्यात आला आहे.
राजीनामा दिल्यानंतर काहीसे भावूक झालेले बिन्नी म्हणाले की, मला फ्लिपकार्ट समूहाच्या गेल्या १६ वर्षांतील कामगिरीचा अभिमान आहे. फ्लिपकार्ट सध्या मजबूत स्थितीत आहे. एक खंबीर नेतृत्व आणि पुढे जाणारा मार्गही कंपनीकडे आहे. कंपनी सक्षम हातात आहे, हे जाणूनच मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top