Home / Top_News / बांगलादेशने स्वातंत्र्यलढ्याचे भिंती चित्र तोडून टाकले

बांगलादेशने स्वातंत्र्यलढ्याचे भिंती चित्र तोडून टाकले

ढाका – बांगलादेशच्या नव्या सरकारने व विद्यार्थी संघटनांच्या आग्रहाखातर लालमोनिरहट येथील स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागवणाऱे भित्तीचित्र पाडून टाकले आहे. स्वातंत्र्यदिनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ढाका – बांगलादेशच्या नव्या सरकारने व विद्यार्थी संघटनांच्या आग्रहाखातर लालमोनिरहट येथील स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागवणाऱे भित्तीचित्र पाडून टाकले आहे. स्वातंत्र्यदिनी हे भित्तीचित्र झाकण्यात आले होते. आता ते पाडूनच टाकण्यात आले आहे.
लालमोनिरहट येथील पालिका उपायुक्तांनी दिलेल्या आदेशावरुन हे भित्तीचित्र पाडून टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या भित्तीचित्रात १९५० साली सुरु झालेला भाषिक लढा, त्यानंतरचा स्वातंत्र्यसंग्राम, मुजीबर सरकारचा शपथविधी, १९७१ चा लढा या साऱ्या प्रसंगाच्या चित्रांचा समावेश होता. आता हे बित्तीचित्र पाडून टाकण्यात आले आहे. बांगलादेशातील सध्याच्या लढ्याशी हे भित्तीचित्र सुसंगत असल्याचे वाटत नसल्याने ते पाडण्यात आल्याचे विद्यार्थी संघाने म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या