बांगलादेशातील आगीत हजारो रोहिंग्यांची घरे बेचिराख

ढाका – बांगलादेशातील कॉक्सबाजार या भागात लागलेल्या भीषण आगीत रोहिंग्या निर्वासित बेघर झाले आहेत. या आगीत या रोहिग्योंची ८०० घरे जळून खाक झाली आहेत. या ठिकाणी ४ हजार रोहिंग्यो निर्वासितांची वस्ती आहे. रविवारी सकाळी लागलेल्या आगीत या सर्व ८०० झोपड्या जळून खाक झाल्या असून या आगीत ५ शाळा आणि २ मशिदीही जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.
रविवारी अज्ञात टोळक्याने ही जाळपोळ केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत असून बांगलादेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशीच ही आग लागली.
म्यानमारमध्ये २०१७ साली झालेल्या लष्करी कारवाईनंतर तिथून अल्पसंख्याक असलेल्या अनेक मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला होता. त्यांच्यासाठी या ठिकाणी बांबू आणि ताडपत्रींच्या सहाय्याने तात्पुरती घरे उभारण्यात आली होती. याच वस्तीला रविवारी सकाळी आग लागली. ही आग नियंत्रणात आली असून कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती बांगला देशच्या निर्वासितांचे संचालक मिझानुर रेहमान यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघाची निर्वासितांची संस्था त्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असून या ठिकाणी आगीच्या घटना अधून मधून घडत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top