Home / News / बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त सामील

बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त सामील

भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो...

By: E-Paper Navakal

भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच हातात झेंडा घेऊन पदयात्रेत चालला.
बागेश्वर बाबांची पदयात्रा झाशीला पोहचली तेंव्हा संजय दत्त खास चार्टड विमानाने झाशीला पोहचला आणि पदयात्रेत सामील झाला. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी हातात भगवा ध्वज घेऊन तो काही अंतर बागेश्वर बाबासोबत पदयात्रेत चालला. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि भगवी शाल घेतलेला संजय दत हर हर महादेवचा जप करताना दिसत होता. यावेळी त्याने सांगितले की बाबा हे सुद्धा मोठे सुपरस्टार आहेत. भारत एकसंघ करणे आणि जातीयवाद दूर करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्याने बागेश्वर बाबांना सांगितले की गुरुजी तुम्ही मला तुमच्या सोबत वर यायला सांगितले तरी मी येईन. तुमची आज्ञा पाळीन असेही तो म्हणाला. या पदयात्रेत भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगही सामील झाली होती.

Web Title:
संबंधित बातम्या