बाद झाल्याने कोहली निराश डोक्यावर हात मारून घेतला

  • व्हिडिओ व्हायरल

चेन्नई :

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली ११६ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. कोहलीने आपल्या डावात सहा चौकार लगावले आणि राहुलसोबत १६५ धावांची भागीदारी केली. मात्र, तो सामन्याचा शेवट तो करू शकला नाही आणि त्याचे शतकही हुकले. टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन तो बाद झाला. त्यामुळे तो निराश झाला. ड्रेसिंगमध्ये गेल्यावर त्याने आपली निराशा व्यक्त करताना कपाळावर दोनदा हात मारुन घेतला. तसेच तो आपली निराशा कॅमेरामॅनपासून लपवण्यासाठी खाली मान घालतानाही दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top