‘बाबा बर्फानीं’चा पहिला फोटो प्रसिद्ध

श्रीनगर –
काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेतून बाबा बर्फानींचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. बर्फाचे शिवलिंग सुमारे ८ फूट उंच आहे. या शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक अमरनाथला येतात. यावेळी २९ जूनपासून यात्रा सुरू होणार असून ती सुमारे ५२ दिवस चालणार आहे. २९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी ती पूर्ण होणार आहे. या यात्रेसाठी १५ एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत २,३८,००० भाविकांनी नोंदणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top