Home / News / बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी ४ आरोपींची पोलीस कोठडी

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी ४ आरोपींची पोलीस कोठडी

मुंबई – राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी न्यायालयाने ४ आरोपींची २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी न्यायालयाने ४ आरोपींची २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार या चारही आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. हे आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आणि दिशाभूल करत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. पोलिसांची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोंबर रोजी रात्री वांद्रे येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

Web Title:
संबंधित बातम्या