Home / News / बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधाराला कॅनडामधून अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधाराला कॅनडामधून अटक

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ ​​जस्सी पुरेवाल याला कॅनडातून अटक करण्यात...

By: Team Navakal

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झीशान अख्तर उर्फ ​​जस्सी पुरेवाल याला कॅनडातून अटक करण्यात आली आहे. कॅनडाच्या सरे पोलिसांनी त्याला अटक केली असून तो सध्या कॅनडामध्ये पोलीस कोठडीत आहे. बाबा सिद्दीकी यांची झीशानने गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलीस तपासात असे आढळले की, जालंधरचा रहिवासी झीशान अख्तर हा सिद्दीकींच्या हत्येमागील सूत्रधार होता. हत्या, दरोडा यासारख्या ९ प्रकरणांत तो फरार होता. सिद्दीकी हत्येनंतर तो परदेशात पळून गेला होता. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्याला पळून जाण्यास मदत केली होती, असे सांगितले जात आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९:३० वाजता माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलवर हत्या करण्यात आली. गँगस्टर लॉरेन्स गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. या प्रकरणीत आता पर्यंत पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराइच येथून हरीश कुमार, हरियाणाच्या कैथल येथून गुरमेल बलजित सिंग, उत्तर प्रदेशच्या येथून बहराइच धर्मराज कश्यप आणि पुणे येथून प्रवीण लोणकर यांना अटक केली.

Web Title:
संबंधित बातम्या