‘बायजूज’च्या दिवाळखोरीसाठी कर्ज देणार्यांची लवादाकडे धाव

बंगळुरु – शिक्षण क्षेत्रातील बायजूज या स्टार्ट-अप कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) दाखल केल्या आहेत.वित्त पुरवठादारांना बायजूजकडून १२ कोटी डॅालर्स कर्जाची वसुली करायची आहे.
बायजूजच्या दिवाळखोरीसाठी पहिली याचिका बायजूजला अर्थसाह्य पुरविणार्या काही वित्त पुरवठादार कंपन्यांनी एकत्रितपणे दाखल केली आहे.ही याचिका बंगळुरुस्थित एनसीएलटीकडे प्रलंबित आहे.दुसरी याचिका टेलिपरफॉर्मन्स बिझनेस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीने दाखल केली आहे.ही टेलिपरफॉर्मन्स बिझनेस सर्व्हिसेस या मूळ फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीची भारतातील उपकंपनी आहे.
टेलिपरफॉर्मन्स बिझनेस सर्व्हिसेसने बायजूजची मूळ कंपनी असलेल्या थिंक अँड प्रा.लिमिटेडला वित्त पुरवठा केला आहे. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीस्थित किग स्टब अँड कसिव्हा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
बायजूजच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वीच एका याचिकेद्वारे केली आहे. बायजूज बीसीसीआयचे १५३ कोटी रूपये देणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top