बारामतीत सुनेत्रा पवार यांचे बॅनर…. रंगणार नणंद भावजय असा सामना?

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेस च्या अजित पवार गटाचे कर्जत येथील 2दिवसाचे अधिवेशन वादळी ठरले… याच अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चार लोकसभेच्या जागा लढवणार असे जाहिर केलं.. या घोषणेला 24 तास उलटत नाहीत तोवरच बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली आहे, म्हणजेच बारामती मतदारसंघात नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार यांचा सामना रंगणार असल्याचे दिसते.
गेले काही महिने सुनेत्रा पवार बारामती मधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहेच, मात्र काल अजित पवार यांच्या घोषणेनंतर या चर्चेला बळ मिळाले आहे…
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला असता ही लोकशाही आहे, माझ्या विरोधात कोणीही निवडणूक लढवू शकते , मात्र निर्णय मायबाप जनतेच्या हातात आहे असे सांगितले. तर सुनेत्रा पवार म्हणाल्या मला अजून कोणीही बोललेले नाहीं.. मी राजकारणात नाहीं त्यामुळे मी निवडणूक लढण्याची सध्या तरी शक्यता नाहीं…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top