बाळांना उंच इमारतीवरून फेकणाऱ्या पिता आणि प्रेयसीला मृत्यूदंडाची शिक्षा

बीजिंग :

चीनमध्ये एका पित्याने आपल्या प्रेसयीच्या साथीने दोन लहान मुलांची हत्या केल्याने खळबळ उडाली. त्यांनी मुलांना उंच इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या प्रकरणी पिता व प्रेसयीवर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यानुसार त्यांना फासावर लटकवण्यात आले.

झँग बो आणि त्याची प्रेयसी ये चेंगचेन यांनी २ नोव्हेंबर २०२० रोजी २ वर्षांची मुलगी आणि एका वर्षाच्या मुलाला १५ व्या मजल्यावरून खाली फेकून दिले होते.
या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास केला असता झँग आणि चेंगचेन यांनीब बाळांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. स्थानिक फिर्यादींनी या दोघांविरुद्ध हेतूपूर्वक हत्या केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

सरकारी वकील कार्यालयाने केलेल्या आरोपानुसार, झँग आणि चेंगचेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. यानंतर ते नात्यात अडकले होते. घटस्फोटित असलेल्या झांगला चेंगचेन वारंवार सांगत होती की, जर तुला मूल असेल तर मी तुझ्यासोबत राहणार नाही. फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांनी दोन्ही चिमुरड्यांची कशापद्दतीने हत्या करण्यात येईल यासाठी कट आखण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अनेकदा समोरासमोर तसंच चीनमधील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप वरून चर्चाही केली होती. यानंतर त्यांनी मुलांचा अपघाताने मृत्यू झाला आहे असे दर्शवले.

खटला दाखल झाल्यानंतर जुलै २०२१ मध्ये पहिली सुनावणी झाली. न्यायालायने २८ डिसेंबर २०२१ मध्ये हेतूपूर्वक हत्या केल्याच्या आरोपाखाली झँग आणि चेंगचेन यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. यानंतर झँग आणि चेंगचेन यांनी या निर्णय आव्हान दिले. गेल्या वर्षी ६ एप्रिलला दुसऱ्यांचा खटल्या सुनावणी सुरु झाली. यावेळी झँगने आपण मुलांची हत्या केली नसल्याचे सांगत आधी दिलेला कबुली नाकारली. मात्र चीनमधील सर्वोच्च न्यायालयाने झँग आणि चेंगचेन यांना दोषी ठरवले. दोघांनी हेतूपूर्वक आणि बेकायदेशीर पद्धतीने मुलांची हत्या केल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top